West Bengal Election Result: बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विजयाची कारणं

ममता बॅनर्जी यांना सत्ता राखण्यात यश कसं आलं?

Updated: May 2, 2021, 04:51 PM IST
West Bengal Election Result: बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विजयाची कारणं  title=

मुंबई : बंगाल विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावूनही, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसला (TMC) सत्तेतूनखाली ओढणं भाजपला शक्य होऊ शकले नाही. विश्लेषकांच्या मते, ममता बॅनर्जी यांची उज्ज्वल प्रतिमा, बंगाली ओळख, महिला आणि अल्पसंख्यांकांचा मोठा कल यांचा थेट फायदा झाला. (West Bengal Election Result 2021)

खरं तर, तृणमूलने भाजपच्या हिंदू मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, 'बंगालला हवी त्यांची मुलगी असा नारा देत टीएमसीने महिला मतदारांना आकर्षित केलं. ममता यांनी याच रणनीतीनुसार यावेळी 50 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली. त्याचबरोबर, इतर राज्यांमधून आलेल्या भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ल्याच्या मुद्द्यावरुन टीएमसीने स्थानिक विरुद्ध बाहेरील असा प्रचार केला. बांगला संस्कृती, बंगाली भाषा आणि बंगाली अस्मितेचा मुद्दा टीएमसीने लावून धरला. (Mamata Banerjee's victory in Bengal)

संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान, बंगालची मुलगी आणि बाहेरील व्यक्ती असा जोरदार प्रचार केला. हा प्रचार विजयात खूप उपयुक्त ठरला. ममता आपल्या निवडणूक सभांमध्ये सतत सांगत होत्या की गुजरातमधील लोकांना बंगालवर राज्य करू देणार नाही. त्याचा संदर्भ मोदी आणि शहा यांच्यावर होता. त्याचबरोबर ते इतर राज्यांतून येथे आलेल्या नेत्यांना संभामधून लक्ष करत होत्या. या माध्यमातून त्यांनी बंगाली कार्ड जोरदारपणे वापरले. याद्वारे, ममता बॅनर्जी यांना विशेषत: स्त्रियांसह बंगाली लोकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळालं.

भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नव्हता किंवा ममता यांना त्यांच्या शैलीत उत्तर देऊ शकणारी कोणतीही महिला नेता नव्हती. दुखापतीनंतरही ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने व्हील चेअरवरुन निर्भयपणे प्रचार केला आणि भाजप नेतृत्वाविरोधात आक्रमक हल्ला केला. त्यामुळे त्यांना सहानुभूती ही मिळाली.

दुसरे म्हणजे, निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासारख्या बड्या केंद्रीय नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला केल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूतीही बनली. बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी ममतांसाठी केलेल्या बर्म्युडा विधानानंतरही महिलांमध्ये वेगळा संदेश गेला. टीएमसीने या वक्तव्याचं भांडवल करण्यास कसलीही कसर सोडली नाही. सहानुभूती कार्ड चालले आणि ते ममताच्या बाजूने गेले. याचाच परिणाम म्हणून बंगालची सत्ता पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर ममतांनी बॅनर्जी आता तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत.