बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (jay shah) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जय शाह (jay shah) हे वडील आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी अमित शाह (amit shah) यांनी केलेल्या कृतीने सर्वांच लक्ष वेधलं आहे.
अमित शाह (amit shah) हे आपल्या कुटुंबासह नवरात्रोत्सवानिमित्त (navratri) देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी बीसीसीआयचे सचिव जय शाह उभे होते. यावेळी जय शाह इतर कोणाशी तरी बोलताना दिसत आहेत. यावेळी रागावलेल्या अमित शाह यांनी हाताने इशारा करत पूजेत लक्ष द्या, असे सागितले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमित शाह यांच्या जय शाह यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बोला! बीसीसीआयच्या सचिव पदासारख्या मोठ्या पदावर बसलेल्या या व्यक्तीला आजही वडिलांनाच शिकवावं लागतं, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.
લ્યો બોલો! બીસીસીઆઈના સેક્રેટરી જેવા ઊંચા પદે બેઠેલા આ બાબાને હજુ પપ્પાએ શીખવાડવું પડે છે... આમા તે આવડું મોટું કામ કેમ કરતો હશે...? શુ ત્યાં પણ પપ્પા શીખવવા જતા હશે?
.
.
.
.#amitshah #jayshah #mansa #BCCI #AamaDhyanAapNe#આમ_ધ્યાન_આપ_ને pic.twitter.com/Xv9oroAzgV— Patel Naresh (@patelnaresh7600) September 29, 2022
तर आणखी एक युजरने जेव्हा अमित शाह वडिलांच्या भूमिकेत असतात असं म्हणत व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Home Minister Amit Shah ji as Dad pic.twitter.com/JRgXGIQz98
— Rosy (@rose_k01) September 29, 2022