हरियाणा : आपल्या छोट्याश्या निष्काळजीपणाचा परिणाम बऱ्याचदा खूप मोठा ठरु शकतो. हे आपण बऱ्याचदा ऐकले आहे. आपल्यापैकी काही जणांनी तर, हे अनुभवले देखील असेल. आपण बऱ्याचदा अनेक गोष्टींना जाऊ दे, काय होतयं असे म्हणून सोडून देतो. परंतु याच छोट्याश्या निष्काळजी पणामुळे ऐखाद्याचे प्राण गेले, मग हा निष्काळजी पणा किता बरं महागात पडला?
अशीच एक निष्काळजीपणाची घटना हरियाणामधून समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, एक व्यक्ती सॅनीटायझरची बाटली भरत असताना धूम्रपान करत होता. त्याचवेळी सॅनीटायझरला आग लागली आणि या व्यक्तीला छोट्याश्या निष्काळजीपणामुळे आपले प्राण गमवावे लागले.
माहितीनुसार, ही घटना हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातील यमुनानगर येथील आहे. येथे विनेश नावाच्या व्यक्तीचा आग लागल्याने मृत्यू झाला आहे. विनेश हा सरोजिनी कॉलनीचा रहिवासी आहे. विनेशचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि तो त्याच्या वडिलांसोबत काम करायचा.
घटनेची माहिती देताना पोलिस स्टेशन आधिकारी जसवीर सिंह म्हणाले की, विनेशने सॅनीटायझरची मोठी बाटली आणली होती आणि तो त्या सॅनीटायझरला छोट्या बाटलीत भरत होता. त्यादरम्यान तो सिगरेट देखील पित होता. त्यादरम्यान सिगरेट त्याच्या अंगावर पडला, त्यामुळे तो स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्न करत असताना सॅनीटायझर त्याच्या अंगावर पडला ज्याने पेट घेतला.
विनेशला त्याच्या कुटूंबियांनी गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात कुटूंबीयांनी कोणावरही आरोप केलेला नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करायला सुरवात केली आहे.