नवी दिल्ली: देशाला लुटणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडुत केले. देशातील प्रत्येक भागात सुदृढ आरोग्य पोहचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तमिळनाडुच्या मदुराईतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) ची पायाभरणी केली. 1200 कोटींच्या किंमतीसाठी एम्सची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मादींनी यावेळी केली. त्यानंतर जमलेल्यांना संबोधीत केले. तामिळनाडूच्या जनतेला याचा लाभ होईल. आमचे लक्ष्य आहे की, तामिळनाडू देशातील एरोस्पेस आणि संरक्षण विभागाचा मुख्य पाया झाला पाहिजे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंजावूर, राजजी आणि तिरुनेलवेलीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे सुपर स्पेशलिटी ब्लॉक्सचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधीत करताना सांगितले, केंद्र सरकार देशाला भ्रष्टाचार मुक्त करणासाठी विशेष वाटचाल करत आहे. देशाला लुटणाऱ्या प्रत्येकावर कायद्याचा बडगा उभारला जाईल. केंद्रच्या एनडीए सरकारच्या प्राथमिकतेमध्ये आरोग्य सेवा क्षेत्राचा समावेश आहे जेणेकरून प्रत्येकजण निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगू शकेल. सरकारची इंद्रधनुष्य योजना ज्याप्रकारे उत्तम जोर धरत आहे त्यामुळे स्वास्थ्य सेवा क्षेत्र नवीन आदर्श कायम करत आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मृत्यू वंदना योजना आणि पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानने सुरक्षित गर्भधारणा एका मोठ्या चळवळी प्रमाणे रुप घेत आहे.
पंतप्रधान मोदींनी आयुष्यमान योजनेला सुद्धा आरोग्य क्षेत्रातील एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले राज्य सरकार चेन्नईला टीबी मुक्त करण्यासाठी विशेष आभियाने राबवत आहे. त्यामुळे 2023 पर्यंत प्रदेश टीबी मुक्त होण्यास मदत होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आम्ही मध्यम आणि गरीब वर्गीय लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी योग्य पाऊले उचलत आहोत.आमचे ध्येय एवढेच आह की विकासाचे फायदे समाजाच्या प्रत्येक विभागात पोहोचवेत'