Chandrayaan-3 Landing On Moon: सर्वांना उत्सुकता लागलेली चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan-3 Landing Update) करणार आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अर्थातच इस्त्रोने ही वेळ जाहीर केलीये. मात्र, परिस्थितीनुसार लँडिंगचा मुहूर्त पुढं ढकलण्याची शक्यता आहे. चांद्रयान-2 वेळी देखील चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड झालं होतं. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड का असतं? याचं उत्तर इस्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर (G Madhavan Nair) यांनी दिलं आहे.
प्रत्यक्ष लँडिंगच्या दिवशी खासकरुन शेवटच्या 15 मिनिटात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण हाच मिशनमधील सर्वात अवघड टप्पा असणार आहे. 'टचडाऊन' ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रत्येकाने सतर्क राहणं आवश्यक आहे, कारण त्याच्या यशासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे, असं नायर म्हणतात. चांद्रयान-3 ची यशस्वी लँडिंग ही ग्रहांच्या संशोधनाच्या पुढील टप्प्यात इस्रोसाठी एक चांगली सुरुवात असेल, असंही जी माधवन नायर (G Madhavan Nair) यांनी म्हटलं आहे.
लाँडिंगवेळी अनेक गोष्टी आहेत ज्यांना एकत्र काम करावे लागेल. थ्रस्टर, सेन्सर्स, अल्टिमीटर, संगणक सॉफ्टवेअर आणि इतर सर्व काही गोष्टींने एकत्र काम केल्यास, काम सोपं होतं. कुठंही काही गडबड झाली तर आपण अडचणीत येऊ शकतो. इस्रोने पुरेसं सिम्युलेशन केले आहे आणि रिडंडंसीवर देखील काम केले आहे, जेणेकरून अशा अपयशाची शक्यता कमी आहे. तरीही, आपल्याला आपल्या बाजूने प्रार्थना करावी लागेल, असं नायर म्हणतात.
Chandrayaan-3 Mission:
‘Welcome, buddy!’
Ch-2 orbiter formally welcomed Ch-3 LM.Two-way communication between the two is established.
MOX has now more routes to reach the LM.
Update: Live telecast of Landing event begins at 17:20 Hrs. IST.#Chandrayaan_3 #Ch3
— ISRO (@isro) August 21, 2023
आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावरून जो डेटा गोळा करू शकतो, तो काही खनिजे, जसं की दुर्मिळ खनिजे, हीलियम-3 वगैरे ओळखण्यासाठी उपयुक्त ठरेल. जर चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंगमध्ये यशस्वी ठरलं, तर अमेरिका, चीन आणि माजी सोव्हिएत युनियननंतर या तंत्रावर प्रभुत्व मिळवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल, अशी माहिती देखील नायर यांनी दिली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.
आणखी वाचा - ... तर 23 नाही 27 ऑगस्टला करावे लागणार चांद्रयान-3 चे लँडिंग; इस्रोची माहिती
दरम्यान, चांद्रयान-३ चं चंद्रावरील लँडिंगचा मुहूर्त पुढं ढकलण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास 23 ऑगस्टला होणारं लॅडिंग 27 ऑगस्टपर्यंत पुढं ढकललं जाऊ शकतं, अशी माहिती इस्त्रोच्या अहमदाबादच्या स्पेश अप्लिशेकन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली आहे.