Toothpick Design: जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर दातात काहीतरी अडकतं. त्यामुळे ते काढण्यासाठी टूथपिकची मदत घेतली जाते. ही त्रास पाहता प्रत्येक हॉटेल आणि घरात टूथपिक पाहायला मिळते. अनेकदा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर बिल देताना सोबत बडीशेप आणि टूथपिक दिली जाते. कारण दातामध्ये अडकलेला पदार्थ काढण्यासाठी मदत होते. पण तुम्ही कधी टूथपिकचा आकार नीट निरखून पाहिला आहे का? टूथपिकच्या मागच्या म्हणजेच वरच्या बाजूला एक विशिष्ट रचना केलेली असते. ही डिझाईन बनवण्यामागे एक खास कारण आहे, चला जाणून घेऊयात.
टेबल मॅनरचा भाग
बहुतेक लोकांना असे वाटते की टूथपिकच्या दुसऱ्या टोकाची रचना चांगली पकड घेण्यासाठी किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी केली असते. परंतु तसे अजिबात नाही. तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. खरं तर, हा टेबल मॅनर किंवा जेवणाच्या शिष्टाचाराचा एक भाग आहे. वास्तविक, टूथपिकच्या मागे बनवलेले डिझाइन होल्डरसारखं कार्य करते.
हे कारण आहे?
जर तुम्ही जेवल्यानंतर टूथपिक वापरत असाल तर तुम्ही डिझाईनचा भाग मागील बाजूने तोडून पुन्हा वापरण्यासाठी ठेवू शकता. समजा तुम्ही एखाद्यासोबत बसून जेवत आहात. यादरम्यान तुमच्या दातांमध्ये काही अडकले तर तुम्हाला टूथपिक वापरावी लागेल. यानंतर, त्याच्या मागे बनविलेले डिझाइन तोडून ते टेबल किंवा प्लेटवर ठेवा. आता तुमची वापरलेली टूथपिक रिंगच्या मध्यभागी ठेवून व्यवस्थित ठेवा. यामुळे तु्ही हवी असल्यास टूथपिक पुन्हा वापरू शकता. अशा प्रकारे, जेवताना तुम्हाला टूथपिक पुन्हा पुन्हा बदलावी लागणार नाही.
त्याचबरोबर टूथपिकवर तयार केलेला डिझाईनचा भाग तोडलेला असेल, तर त्याचा वापर केल्याचे समजते. या टूथपिकचा पुन्हा वापर करू नका. रिपोर्ट्सनुसार, ड्यूक युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हेन्री पेट्रोव्स्की यांनीही आपल्या पुस्तक द टूथपिकमध्ये हे सांगितले आहे.