मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्नी आत्महत्या करत असताना पती तिचा व्हि़डिओ शूट करत होता. पत्नीला रोखण्याऐवजी पतीने तिचा लाईव्ह व्हिडिओ बनवला. पोलिसांनी सासरच्या लोकांविरोधात हुंड्याची मागणी करत असल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पती राजकपूर आणि सासू विमलाला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना गुरुवारची आहे पण शनिवारी मात्र या प्रकरणात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला जेव्हा सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 12 मिनिंटं 14 सेकेंदांचा हा व्हिडिओ आहे. पोलिसांनी देखील या व्हिडिओच्या चौकशीनंतर म्हटलं आहे की, हा व्हिडिओ सासरच्या लोकांनाच बनवला आहे. सासू आणि तिची मुलगी फक्त बोलून तिला आत्महत्या न करण्यासाठी सांगत आहे.
गीताचा राजकपूरसोबत 22 एप्रिल 2015 ला विवाह झाला होता. काही दिवसानंतर सासरच्य़ा लोकांनी गीताकडे कारची मागणी करत होते. तिचा छळ केला जात होता. अनेकदा तिला मारहाण देखील होत आहे.