संपलेल्या औषधांचे रिकामं पाकिट कचरा म्हणून फेकू नकe... कारण त्यापासून स्वयंपाकघरातील ही गोष्ट होईल अतिशय साफ समजून फेकून देत असाल तर असे करू नका. कारण यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील भरपूर मेहनत वाचणार आहे. याच्या मदतीने तुम्ही जळलेली भांडी आणि तवे स्वच्छ करू शकता. असे केल्याने तुमची भांडी कोणताही विशेष प्रयत्न न करता चमकू लागतात.
आपण स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरतो. जास्त करून तवा आणि कढई यांची सर्वाधिक गरज असते. अन्न शिजवताना ही दोन्ही भांडी जळतात आणि काळी पडतात. ते स्वच्छ करण्यासाठी, बरेच लोक साबण वापरतात आणि काही राख वापरतात. तरीही भांडी पूर्वीसारखी चमकत नाहीत. अशावेळी ही किचन टिप्स तुम्हाला मदत करेल.
भांडी नवीन तेवढीच चांगली ठेवायची असतील तर घरात पडून असलेली औषधाची रिकामं पाकिट यासाठी नक्कीच मदत करु शकतात. आपण अनेकदा औषधांचे रॅपर कचरा समजून फेकून देतो. तुम्हीही हे करत असाल तर आता करू नका. कारण रिकाम्या झालेल्या औषधांचे रॅपर तुमच्या स्वयंपाकघरातील काम अधिक सोपे करू शकतात. किचनमध्ये औषधाचे रॅपर कसे वापरू शकता.