सुदृढ आणि निरोगी गर्भधारणेसाठी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले 5 टीप्स

गरोदरपणाच्या काळात महिलांनी आपले शरीर आणि मन दोन्हीही निरोगी ठेवण्याकडे लक्ष द्यावे. श्री श्री रविशंकर यांच्या काही साध्या टिप्स गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. गरोदरपणातील काही उपयुक्त गुपीत जाणून घ्या

Updated: Feb 10, 2025, 03:12 PM IST
सुदृढ आणि निरोगी गर्भधारणेसाठी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले 5 टीप्स title=

Pregnancy Tips: गर्भधारणा हे प्रत्येक महिलेच्या जीवनातील आनंददायक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. या काळात आई आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक असते. मोठी माणसे आणि अनुभवी लोक गर्भवती महिलांना अनेक प्रकारचे सल्ले देतात. त्याचप्रमाणे, प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी देखील गर्भवती महिलांसाठी काही विशेष टीप्स दिल्या आहेत, ज्या महिलांना एक निरोगी आणि आनंदी गर्भावस्था मिळवण्यास मदत करू शकतात.

शास्त्रानुसार आणि आधुनिक विज्ञानानुसार, मनःशांती, सकारात्मक विचार आणि योग्य जीवनशैली यांचा होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. श्री श्री रविशंकर यांनी दिलेल्या काही टिप्स गर्भवती महिलांना शारीरिक आणि मानसिकरित्या संतुलित राहण्यास मदत करतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Art of Living USA (@artoflivingusa)

1. शांत संगीत ऐका

गर्भवती महिलांनी रोज शांत आणि सकारात्मक संगीत ऐकावे. विशेषतः झोपण्याच्या आधी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकल्यास मन शांत होते आणि चांगले वाटते. संशोधनानुसार, अशा संगीताचा बाळावरही सकारात्मक परिणाम होतो.

2. हॉरर चित्रपट

गरोदर महिलांनी भयानक किंवा हिंसक चित्रपट आणि टीव्ही शोज पाहणे टाळावे. श्री श्री रविशंकर यांच्या मते, असे दृश्य बघितल्याने मन अस्वस्थ होते, तणाव वाढतो आणि गर्भातील बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.

3. जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर

श्री श्री रविशंकर यांच्या मते, हिरवा रंग गर्भवती महिलांसाठी शुभ आणि फायदेशीर मानला जातो. त्यामुळे महिलांनी शक्य असल्यास हिरव्या रंगाचे कपडे घालावेत आणि आपल्या आजूबाजूला हिरव्या रंगाच्या वस्तू ठेवाव्यात. हिरवा रंग डोळ्यांना सुखावतो आणि मन प्रसन्न ठेवतो.

४. लाल आणि करड्या रंग टाळा

बऱ्याच महिलांना लाल रंग आवडतो, पण श्री श्री रविशंकर यांच्या मते गर्भवती महिलांनी लाल आणि ग्रे (करडा) रंगाचे कपडे घालू नये. सभोवतालीदेखील या रंगाच्या वस्तू ठेवणे टाळा. हे रंग मानसिक तणाव आणि अस्थिरता निर्माण करू शकतात.

हे ही वाचा:ऑफिसमधील सततच्या डोकेदुखीची कारणे, लक्षणे आणि योग्य उपाय

इतर उपयुक्त टीप्स

ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम – नियमितपणे ध्यान आणि प्राणायाम केल्याने मन शांत राहते आणि शरीरातील ऊर्जा संतुलित राहते.

सकारात्मक विचार ठेवा – गरोदर महिलेच्या भावनांचा बाळावर परिणाम होतो, त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

पौष्टिक आहार घ्या – निरोगी गर्भावस्थेसाठी फळे, भाज्या, दूध आणि सुका मेवा यांचा आहारात समावेश करा.

सकारात्मक जीवनशैली आणि आनंदी मन हेच निरोगी बाळासाठी सर्वात मोठे गुपित आहे.