धाराशिवच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याने राज्याच्या अप्पर सचिवांना पत्र लिहिलं आहे. गुलामासारखी वागणूक मिळत असल्याचा उल्लेख करत दिला आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. रोहन कांबळे असं या अभिनेत्याचं नाव आहे. रोहन कांबळे यांच्या या पत्राने खळबळ उडाली आहे.
'अभियंता आहे ,गुलाम नाही', असं पत्र लिहून धाराशिव येथील कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. आपल्याला गुलामासारखी वागणूक दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप रोहन कांबळे यांनी आपल्या पत्रातून केला आहे.
अनेकदा तक्रार करूनही व्यवस्थेत बदल होत नसल्यामुळे राजीनामा स्वीकारून परिस्थितीत बदल करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी असा त्यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. विश्रामगृहावर विशेष अतिथींची बडदास्त ठेवण्यापेक्षा अभियंता म्हणून असलेली मूळ जबाबदारी पार पाडण्यात आपल्याला स्वारस्य आहे. त्यामुळे आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती रोहन कांबळे यांनी आपल्या पत्राद्वारे अतिरिक्त मुख्य सचिवांना केली आहे. रोहन कांबळे हे धाराशिव येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कांबळे यांच्या या पत्रामुळे खळबळ माजली आहे.