वृद्ध आई-वडिलांना न सांभाळल्यास....', पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

Solapur GramPanchayat: सोलापुरातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने ठराव केलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2025, 01:43 PM IST
वृद्ध आई-वडिलांना न सांभाळल्यास....', पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय title=
हिप्परगा ग्रामपंचायत

Solapur GramPanchayat: आई वडील जीवाचं रान करुन मुलांना शिक्षण देतात, लहानाचं मोठं करतात. पण हेच आई-वडील वृद्ध झाल्यावर काही कृतघ्न मुलं त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. शेजारी, नातेवाईक, समाजाच्या दबावापोटी काहीजण आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाहीत. घरी असलेल्या आई-वडिलांना चांगली वागणूक दिली जात नाही. अशावेळी वृद्ध आई-वडील मरणाच्या दिवसाची वाट पाहत राहतात. दरम्यान एका ग्रामपंचायतीने वृद्ध आईवडिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या मुलांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय. 

सोलापुरातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने ठराव केलाय. ज्या ठरावाचे राज्यभरातून कौतुक केले जातंय. जी मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळणार नाहीत त्यांना ग्रामपंचायतीच्या सुविधा दिल्या जाणार नाहीत, असा ठराव ग्रामपंचायतीने केलाय. उत्तर सोलापूर तालुक्यातील स्पर्धा ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे. 

अशा प्रकारचा ठराव करणारी तळे हिप्परगा ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. आई वडील हे मुलांना मोठे करतात मात्र त्यांच्या म्हातारपणात त्यांना घराबाहेर काढल्यास त्यांना कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही ग्रामपंचायतीने हा ठराव केलेला आहे आणि त्याचे लोकांनी स्वागत केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. 

त्याचबरोबर गावात डिजिटल फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असल्याचाही ठराव यावेळी करण्यात आला आहे.

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द

आई-वडिलांचा काळजी न घेणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या मुलांना यामुळे मोठी चपराक बसली आहे. अशा मुलांविरुद्ध कारवाईचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याआआधी कोल्हापूरच्या माणगाव ग्रामपंचायतीने असा निर्णय 20 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आला होता. आता यरोळ ग्रामपंचायतीने हा स्तुत्य असा निर्णय घेतला आहे.  अलिकडच्या काळात आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करणारे मुलं-मुली अनेकदा तुम्ही पाहीली असतील. अशा मुला-मुलीला चाप बसवणारा आदेश लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनं काढला आहे. आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि अशी तक्रार आल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासीक निर्णय लातूर जिल्ह्यातील येरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे. हा निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने सर्व गावकऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केला. आता या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनीही स्वागत केला आहे. असा निर्णय घेणारी लातूर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. याआधी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला होता.