Ed Sheeran India Bengaluru Viral Video : लोकप्रिय हॉलिवूड गायक एडी शीरन हा नुकताच बंगळुरुमध्ये रस्त्याच्या किनाऱ्याला लाइव्ह परफॉर्म करताना दिसला. त्यावेळी त्याला पोलिसांनी असं करताना अडवल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आणि त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यानं खरंच परवानगी घेतली नव्हती का असा प्रश्न उपस्थित झाला. या सगळ्या प्रकरणानंतर स्वत: एडी शीरननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
एडी शीरन आणि त्याच्या टीमनं या सगळ्या प्रसंगानंतर सांगितलं की हे सगळं आधीच ठरलं होतं. अर्थात तिथे तो परफॉर्म करणार हे ठरलं होतं आणि आधीच परवानगी घेतली होती. आता पोलिसांनी या गोष्टीला घेऊन मोठा खुलासा केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनुसार अशी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नव्हती. डीसीपी सेंट्रल बंगळुरु शेखर टी टेक्कन्नानवरनुसार, या कार्यक्रमाचे आयोजकांपेक्षा एक व्यक्ती त्यांना भेटायला आली होती आणि चर्च स्ट्रीटवर प्रदर्शन करण्याची परवानगी मागत होती.
खरंतर, शेखर टी टेक्कन्नानवर यांनी हे स्पष्ट केलं की त्या ठिकाणी खूप गर्दी झाली आणि ते पाहता परवानगी देण्यात आली नाही. त्यांनी सांगितलं की 'या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक सदस्य चर्च स्ट्रीटवर स्ट्रीट साइड प्रदर्शन करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी मला भेटायला आला होता. मी परवानगी देण्यास नकार दिला, कारण चर्च स्ट्रीटमध्ये खूप गर्दी होती. याच कारणामुळे रस्त्यावरून ही गर्दी कमी करण्यासाठी परफॉर्मन्स बंद करण्यास सांगण्यात आलं.'
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एडी शीरन 'शेप ऑफ यू' हे गाणं गाताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडित तो गाण्याची सुरुवात करत असल्याचे दिसून आले नाही. त्याला त्याच्या चाहत्यांना ही भेट द्यायची होती त्यामुळे तो उत्साही होता. त्यात एडी शीरननं गाण्याला सुरुवात केल्यानंतर काहीच काळात पोलीस तिथे आले आणि त्यांनी सिस्टम डिस्कनेक्ट केलं.
हेही वाचा : 'गर्लफ्रेंड सोडून गेली तर...', सलमान खानने पुतण्याला दिला ब्रेकअपसंदर्भातील लाखमोल्याचा सल्ला
दरम्यान, एडी शीरन यावेळी इंडिया टूरवर आहे. तो भारतात कॉन्सर्ट करत आहे. त्यानं आतापर्यंत हैदराबाद आणि चैन्नईमध्ये परफॉर्म केलं आहे. चेन्नईमध्ये त्यानं एआर रहमानसोबत स्टेज शेअर करत धम्माल केली.