रणवीर अलाहाबादियाच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये 'या' मुलीसोबत व्हॅलेंटाइन वीक साजरा करत असल्याची चर्चा

यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडीयावर त्याच्या ब्रेकअपची बातमी वेगाने पसरत असतानाच नुकतंच त्याने आपल्या फॅनसोबत व्हॅलेंटाइन वीक साजरा करत असल्याची चर्चा रंगत आहे. 

Updated: Feb 10, 2025, 11:48 AM IST
रणवीर अलाहाबादियाच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये 'या' मुलीसोबत व्हॅलेंटाइन वीक साजरा करत असल्याची चर्चा title=

Ranveer Allahabadia Girlfriend: यूट्यूबवर 'बीअर बायसेप्स' म्हणून प्रसिद्धी मिळवलेला रणवीर अलाहाबादिया याच्या सध्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. रणवीर आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडीयावर त्याच्या ब्रेकअपची बातमी वेगाने पसरत आहे. मात्र, अद्याप याबाबत खरी माहिती अजून समोर आली नाही. रणवीर आणि त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड निक्की शर्मा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत होती. 

मात्र, नुकतंच त्या दोघांनी एकमेकांना सोशल मिडीयावर अनफॉलो केल्याचं समोर आलं आणि यावरुन चाहते आता रणवीर आणि निक्कीचा ब्रेकअप झाला असल्याचा अंदाज बांधत आहेत. खरंतर, रणवीरने त्याच्या अकाउंटवरुन निक्कीसोबतची पोस्टसुद्धा काढून टाकली. अशातच, आता रणवीरची फॅन त्याच्यासोबत व्हॅलेंटाइन वीक साजरा करत असल्याची एक वेगळीच बातमी समोर आली आहे. याचे फोटोजसुद्धा त्या दोघांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. 

रोहिणीचे रणवीरसाठीचे प्रेम

काही काळापूर्वी रणवीरची फॅन रोहिणी आरजू लोकांमध्ये खूप चर्चेत होती. त्याने युट्यूबर रणवीरच्या नावाचा टॅटूसुद्धा काढला आहे. रोहिणीने आपल्या रणवीरबद्दलचे प्रेम व्यक्त करत असलेले बरेचसे फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तर ती करवा चौथचा सण साजरी करताना दिसत आहे. 

रणवीरने साजरा केला फॅनसोबत व्हॅलेंटाइन वीक

नुकतीच सोशल मिडीयावर तिची आणखी एक पोस्ट समोर आली आहे, ज्यामध्ये ती रणवीरसोबत व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करताना दिसत आहे, यावेळी तिने लिहिले आहे की, “देवा, प्रत्येक जन्मात रणवीर हाच माझा व्हॅलेंटाइन असू दे. जसे राधा श्री कृष्णासोबत आहे, माता पार्वती भगवान शिवासोबत आहे आणि श्री राम माता सीतेसोबत आहेत, तसेच आपले प्रेमदेखील काळ आणि नियतीच्या पलीकडे आहे, आपले प्रेम अमर आहे आणि प्रत्येक जन्मात एकत्र राहील."

 

रोहिणीला केले ट्रोल

रोहिणीने याआधी रणवीरसाठी करवा चौथ साजरी केल्यावर सोशल मिडीयावर ती चर्चेत आली होती. यावेळी तिने स्वत:ला वधूप्रमाणे सजवले होते आणि रणवीरवरचे तिचे प्रेम उघडपणे व्यक्त करताना ती दिसली. इतकेच नाव्हे तर ती तिच्या पोस्टमध्ये रणवीरच्या फोटोची पूजा करताना दिसली. यावर त्यावेळी  रणवीरकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, लोकांनी रोहिणीला तिच्या या वागण्यावरुन खूप ट्रोल केले आहे.

 

रणवीर आणि निक्कीचे नाते

रणवीरच्या नात्याबद्दल बोलायचे झाल्यास, निक्कीने आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर लंडनमधील रणवीरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यामुळेच निक्की आणि रणवीरच्या नात्याची चर्चा रंगू लागली. या फोटोजमध्ये रणवीरने निक्कीचा चेहरा लपवला होता, पण निक्कीनेही तिच्या अकाउंटवर त्याच ठिकाणाचे आणि त्याच आउटफिटमधले फोटोज शेअर केले होते. म्हणूनच चाहत्यांपासून हे रहस्य लपून राहिले नाही. त्यांच्या ब्रेकअपबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.