सध्या सगळीकडे लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. आज सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 86810 रुपये 22 कॅरेट सोन्याचा दर 79590 रुपये प्रकि 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी बदल झाले आहेत. चांदीचा दर 99400 प्रति किलोवर स्थिर झाला आहे.
सोन्याचा भाव वाढतच असून, रविवारी तो प्रति तोला 87 हजार 700 रुपये होता, अशी माहिती सराफा व्यावसायिकांकडून देण्यात आली. 20 जानेवारीपर्यंत हाच भाव 81 हजार रुपये होता. सोन्याची भाववाढ अशीच होत राहिल्यास कदाचित वर्षभरात तो एक लाख तोळापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
सध्या भाववाढीमुळे आता सोन्याची जेमतेम खरेदी-विक्री सुरू आहे. केवळ लग्न, मुंज किंवा अन्य घरगुती कार्यक्रम असणारी मंडळीच सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे सोनसाखळी, अंगठी, मंगळसूत्राची खरेदी केली जात आहे. सोन्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार धीम्या गतीने सुरू आहेत, असे व्यावसायिकांनी सांगितले.
अमेरिकेत सत्ताबदलानंतर धोरणांमध्ये झालेले बदल, कॅनडामधील बँकेचे कमी झालेले व्याजदर, यामुळे सोन्याच्या दरांत वाढ झाली आहे.
2024-25मधील दर
दर (प्रति तोळा)
नोव्हेंबर 75000 रुपये
डिसेंबर 78000रुपये
जानेवारी 82000 रुपये
फेब्रुवारी 87500 रुपये
आजही, पटनाच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर आहे. आज ते 85300 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. जर यात जीएसटी जोडला तर त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87859 रुपये होईल. 22 कॅरेट सोन्याची किंमतही त्याच्या उंचीवर आहे. आज ते प्रति 10 ग्रॅम 79700 रुपये आहे. त्याचप्रमाणे, 18 कॅरेट सोने देखील त्याच्या सर्वोच्च पातळीवर आहे. आज ते प्रति 10 ग्रॅम 674000 रुपयांना विकले जात आहे. यामध्ये जीएसटी जोडण्यात आलेला नाही.
आजही चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. आजही चांदीचा भाव प्रति किलो 96000 रुपये आहे. जर त्यात जीएसटी जोडला तर त्याची किंमत प्रति किलो 98880 रुपये होईल, तर जीएसटी न जोडता जुन्या चांदीच्या दागिन्यांचा विनिमय दर प्रति किलो 89000 रुपये आहे.