IND vs ENG 2nd ODI: सोशल मीडियावर एका व्हिडीओची खूप चर्चा होत आहे. हा व्हिडीओ बघून हे समजते की क्रिकेटच्या खेळात काहीही अशक्य नाही. याशिवाय कधीही आणि कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. खरंतर, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू शुभमन गिलने 'सुपरमॅन' स्टाईलमध्ये अप्रतिम झेल घेतला. या झेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. शुभमन गिलच्या गरुडासारख्या नजरेतून चेंडू सुटू शकला नाही. क्रिकेटच्या मैदानावर शुभमन गिलची बिबट्यासारखी चपळता पाहून जगभरातील चाहते त्याचे कौतुक करत आहेत. या झेलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा दमदार झेल शुबमन गिलने रविवारी कटकमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घेतला होता.
रविवारी कटकमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान शुभमन गिल अचानक चर्चेत आला. शुभमन गिल त्याच्या एका झेलमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिलने 'सुपरमॅन' स्टाईलने इंग्लंडचा खतरनाक फलंदाज हॅरी ब्रूकचा आश्चर्यकारक झेल घेतला. हा झेल इंग्लंडच्या डावाच्या 30व्या षटकात घेतला. इंग्लंडच्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा 30व्या षटकात गोलंदाजी करायला आला. हर्षित राणाच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा दमदार फलंदाज हॅरी ब्रूकने सरळ षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या नशिबाने दगा दिला.
हे ही वाचा: पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे 'हे' 7 क्रिकेटपटू नव्हते मुस्लिम, एकाने स्वीकारला होता इस्लाम धर्म
हर्षित राणाच्या या संथ चेंडूला जोरात मारण्याच्या प्रयत्नात हॅरी ब्रूकला योग्य वेळ देता आली नाही आणि चेंडू हवेत गेला. शुभमन गिल मिड-ऑफ भागातून मागे धावला आणि त्याची गरुडासारखी नजर चेंडूवर स्थिरावली. पाठीमागे धावताना चेंडूवर लक्ष ठेवणे कधीच सोपे नसते, पण २५ वर्षीय शुभमन गिलने ते सहज केले आणि 'सुपरमॅन' स्टाईलने अप्रतिम झेल घेतला.
हे ही वाचा: महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार जगातील सर्वात मोठा भूजल पुनर्भरण प्रकल्प, 73 गावांना होणार फायदा
Partnership broken in style!
An excellent running catch by Vice-captain Shubman Gill
Follow The Match https://t.co/NReW1eEQtF#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill pic.twitter.com/tbtNEu1l0V
— BCCI (@BCCI) February 9, 2025
हे ही वाचा: लग्नाची तारीख ठरली, वधूही तयार झाली... पण 'या' क्रिकेटपटूने संघासाठी केला मोठा त्याग
शुभमन गिलच्या या उत्कृष्ट झेलने हॅरी ब्रूकचा डाव संपुष्टात आला. हॅरी ब्रूक 52 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. शुभमन गिलच्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.