Mandakini On Changing Clothes : बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांची ओळख ही 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटामुळे आहे. या चित्रपटातील त्यांची गंगा ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मंदाकिनी 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यावेळी प्रत्येकाला त्यांच्यासोबत काम करायचं होतं. आजच्या आणि आधीच्या अभिनेत्रींच्या तुलनेत आधी इतक्या सुविधा नव्हत्या. त्या काळी त्यांची भलीमोठी टीम नसायची. आता अभिनेत्री या व्हॅनिटीमध्ये कपडे बदलतात आणि आराम ही करु शकतात. पण 80-90 च्या दशकात असं नव्हतं. बऱ्याच वर्षांपूर्वी मंदाकिनी यांनी अभिनयातून आणि अर्थातच चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला होता. दरम्यान, नुकतीच त्यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या काळावर वक्तव्य केलं आहे.
मंदाकिनी यांनी यावेळी 'इंडियाज बेस्ट डांसर' या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी हर्ष लिंबाचियानं मलायका अरोराला विचारलं की आजकाल जेव्हा अभिनेत्रींसोबक खूप मोठी टीम असल्याचं दिसतं. मलायका मॅम तुमच्यासोबत किती लोकं असतात. मलायका म्हणाली, त्याविषयी चर्चा करायला नको. त्यानंतर मंदाकिनी म्हणाल्या, 'आम्ही लोकं ड्रेस कसे बदलायचो? स्टुडियोमध्ये आहे तर तिथे मेकअप रुम असायचा जिथे कपडे बदलू शकतात. पण आउटडोर विचार करा. कसं करत असतील.'
या विषयी सांगत मंदाकिनी पुढे म्हणाल्या, 'कधी कोणाला विनंती करावी लागत होती. कोणाचं घर असलं तर त्यांना विनंती करायचो की कृपया तुमचा एक रुम मिळू शकतो का? त्यानंतर त्यांचा रुम घ्यायचो. कधी चार-पाच लोकं उभी रहायची आणि परद्यानं पूर्ण कव्हर करायचे आणि त्यात आम्ही कपडे बदलायचो. त्यावेळी राग यायचा आणि थोडं वाईटही वाटायचं. पण काही नाही, कारण प्रत्येक व्यक्ती असंच करत होता.'
मंदाकिनी यांनी 1985 मध्ये 'राम तेरी गंगा मैली' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि मंदाकिनी या एका रात्रीत लोकप्रिय झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी ब्रेकच घेतला. त्यांच्या या ब्रेकविषयी कारण सांगत मंदाकिनी म्हणाल्या त्यांनी अनेक चित्रपट साइन केले होते. 10 दिवसांपर्यंत एका चित्रपटाचं शूटिंग केलं पण अचानक दिग्दर्शक गायब झाला. त्यांना शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण ते कधी भेटले नाही.
हेही वाचा : प्रसिद्ध गायिकेने 4 मुलांच्या बापाशी केल लग्न, 45 भाषांमध्ये गायलीयेत 50 हजारांपेक्षा जास्त गाणी
मंदाकिनी यांचा सगळ्यात शेवटचा चित्रपट हा 1996 मध्ये प्रदर्शित झाला. त्यांनी 1990 मध्ये डॉ काग्युर टी रिनपोचे ठाकुर यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर ते बौद्ध भिक्षु झाले. मंदाकिनी आणि त्यांचे वडील एक तिब्बती हर्बल सेंटर चालवतात आणि त्यांना दोन मुलं आहेत.