IND vs ENG Video Viral : भारतीय क्रिकेट संघाची सध्याची कामगिरी पाहता पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींनी या खेळाकडे आपला मोर्चा वळवला आहे. अशाच या भारतीय क्रिकेट संघाच्या वतीनं कटकमधील सामन्यात कर्णधार रोहित शर्मा यांनं शतकी खेळी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रोहितच्या खेळाचं प्रदर्शन पाहता त्याला पुन्हा एकदा सूर गवसला आहे असंच अनेक क्रिकेट विश्लेषकांनी आणि क्रिकेटप्रेमींनीही म्हटलं. हाच रोहित एकिकडे स्वत:चा फॉर्म जपत असताना संघाचा कर्णधार म्हणूनही आपली भूमिका पार पाडताना दिसत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सामन्याचत रोहित एका शांत कर्णधारासमवेत एका संतप्त कर्णधाराच्या रुपातही समोर आला, जिथं त्यानं हर्षित राणाला एका चुकीमुळं झापलं. इंग्लंडचा संघ 32 व्या षटकात फलंदाजी करत असताना हर्षित राणानं गोलंदाजीचा चांगला मारा सुरु ठेवला. पण, पाचव्या चेंडूवर मात्र घोळ झाला आणि इंग्लंडच्या संघाला सहजपणे 4 धावा मिळाल्या. बस्स, रोहित शर्मानं इथंच नाराजीची प्रतिक्रिया दिली.
हर्षितच्या पाचव्या चेंडूवर जोस बटलरनं डिफेंड केलं आणि पुढच्याच क्षणी हर्षितनं थ्रो दिला. पण, त्यानं भिरकावलेला चेंडू वेगळ्याच दिशेला थेट सीमारेषेपाशी गेला आणि इंग्लंडच्या संघाला 4 धावांचा बोनस मिळाला. हर्षितची ही चूक पाहिल्यानंतर मात्र रोहितचा संताप अनावर झाला. 'तेरा दिमाग किधर है..., किधर मार रहा है...' असं म्हणत रोहितनं संतापाच्या सूरात आणि हावभावात हर्षितला रागे भरताच नेहमीप्रमाणे या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Rohit to Harshit: Dimag kidhar hai tera
Heis so pure guy pic.twitter.com/bJSV5Uk9ql
— MAHI (@mahiiii45) February 9, 2025
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. कोणी रोहित शर्मा एक कर्णधार म्हणून त्याच्या जागी योग्यच आहे असं म्हणत कोणी रोहित जरा जास्तच संतापला असंही म्हटलं. इथं रोहितची संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच तिथं हर्षितलाही आपण मोठी चूक केल्याची जाणीव झाली आणि त्याच्या चेहऱ्यावरही शून्य प्रतिक्रिया दिसल्यानं या क्षणाची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली.