White Mark on Nails: सध्याच्या बदलत्या वातावरणात प्रत्येकाजण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत असतो. अगदी लहानातली लहान लक्षणे दिसल्यास आपण डॉक्टरांकडे जातो. कारण बऱ्याचदा किरकोळ वाटणारी लक्षणे ही गंभीर आजाराला आमंत्रण देऊ शकतात. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा बऱ्याचदा डॉक्टर नखे तपासत असताना अनेकांनी पाहिलं असेल. मात्र, यामागचं कारण अनेकांना माहित नसेल. खरंतर, आपल्या शरीरात एखादा घटक कमी असल्याची किंवा एखादा गंभीर आजार जडण्याची लक्षणे आपल्याला सहजपणे दिसतात. मात्र, आपण अशा किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. आपली नखेसुद्धा आरोग्याच्या समस्यांची अशीच काही लक्षणे दर्शवतात.
आपल्या नखांवर बऱ्याचदा आपल्याला पांढरा डाग दिसला असेल. नखावरील या पांढऱ्या डागाला लुनुला (Lunula) असे म्हणतात. नखावरील ज्या पांढऱ्या डागाला आपण किरकोळ समजतो तो शरीरातील गंभीर समस्यांचे लक्षण असल्याचे तज्ज्ञांनी सांगतात. असं होण्यामागचं कारण जाणून घेऊयात.
आपल्यापैकी अनेकांच्या नखांवर पांढरे डाग दिसत असतील. बऱ्याच लोकांच्या मते, हे डाग कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. खरंतर, नखांवरील पांढरे डाग कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत नाहीत. रिपोर्टनुसार, नखांवर पांढरे डाग मुख्यतः लहान मुलांमध्ये दिसतात. याची दोन मुख्य कारणे समोर आली आहेत. एक म्हणजे शरीरातील पोषकत्त्वांची कमतरता आणि दुसरे म्हणजे शरीरात रक्तातील प्रथिनांच्या कमतरता.
सायन्स फोकसच्या रिपोर्टनुसार, नखांवरचे हे पांढरे डाग तात्पुरते असतात. नखांवरील हे पांढरे डाग कालांतराने नाहीसे होतात. खरंतर, नखे हळूहळू वाढतात आणि म्हणूनच नखांची वाढ होत असताना नखांवरचे हे पांढरे डाग हळूहळू नाहीसे होतात. नखांवरच्या या पांढऱ्या डागांना वैज्ञानिक भाषेत ‘ल्युकोनीचिया’ असे म्हणतात.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, नखांवर पांढरे डाग होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात मिनरल्सची कमतरता. परंतु, हे आजारांचे लक्षणही असल्याचे मानले जाते. अनेकदा किडनी फेल्योर, हृदयविकार, न्यूमोनिया, एक्जिमा, आर्सेनिक विषबाधा यांसारख्या आजारांमुळे नखांवर पांढरे डाग दिसतात. याव्यतिरिक्त बुरशीजन्य संसर्ग, अॅलर्जी आणि नखांना दुखापत झाल्यामुळेही नखांवर पांढरे डाग दिसू लागतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)