Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान सतत चर्चेत आहेत. आता नुकताच तो पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये दिसला. त्याला पाहून त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुतण्याच्या पॉडकास्टमध्ये सलमाननं अनेक गोष्टींविषयी चर्चा केली. त्यानं या सगळ्यात वेगवेगळ्या गोष्टींवर स्वत: चं मत मांडलं.
सलमाननं अरहान आणि त्याच्या मित्रांना 'प्रेम', 'रिलेशनशिप' आणि 'ब्रेकअप'वर सल्ले दिले आहेत. काका असल्याच्या नात्यानं पुतण्याला ब्रेकअपनंतर रिलेशनशिपमधून लवकर मूव्ह ऑन करण्याविषयी सांगितलं. सलमान म्हणाला, 'जर तुमच्या गर्लफ्रेंडनं तुमच्यासोबत ब्रेकअप केला तर तिला जाऊ द्या. तिला बाय बाय करा. जेव्हा तुम्हाला कोणतंही बॅन्डएड काढायचं असतं तेव्हा कसं करतात? हळू? नाही ना अगदी जोरात. त्यामुळे तुमच्या रुममध्ये जा, तिथे रडून घ्या आणि तिथेच हे सगळं प्रकरण संपवा. बाहेर या आणि मग बोला काय सगळं ठीक ना? सगळं कसं सुरु आहे?'
या दरम्यान, हे देखील समजवलं की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चुका मान्य करता याययला हवं. ते म्हणाले की कायम तुमची चूक तुम्ही मान्य करायला हवी. सॉरी आणि थॅंक्यू लगेच बोलायला हवं. सलमाननं अरहानला पुढे सांगितलं की 'जर तुमची कोणी फसवणूक करत असेल तर त्यातून कसं बाहेर यायचं आणि एका व्यक्तीमधून कसं वेगळं व्हायचय. त्यावर सल्ला देत सलमान म्हणाला, तू एक रिलेशनशिपमध्ये ये, त्या रिलेशनशिपमध्ये तू किती काळ आहेस हे महत्त्वाचं नाही. तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये 40-50 वर्षांपर्यंत राहू शकता आणि तुम्हाला तेव्हा जाणवतं की त्या व्यक्तीनं माझी फसवणूक केली आहे.'
सलमाननं पुढे सांगितलं की तेव्हा तुमच्यात तितकी ताकद असायला हवी की तुम्ही त्या परिस्थितीतून 30 सेकंदातून बाहेर यायला हवं. जर तुम्ही रडत बसलात तर तुम्ही हरला. तुम्हाला अशा प्रकारे वागायला हवं की या गोष्टीला होऊन 6 महिने झाले आहेत आणि हे मैत्रित देखील असू शकतं. आता या घटनेला सहा महिने झाले आहेत. जेणेकरून जास्त त्रास होणार नाही.
हेही वाचा : 'त्यावेळी प्रचंड राग यायचा, पण...'; मोकळ्या जागेत कपडे बदलण्यावरून मंदाकिनी यांचा संताप
सलमान खानच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांनाच माहित आहे. त्याचं नाव अनेकदा अनेकांसोबत जोडण्यात आलं आहे. त्यात त्याचं नाव संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ सारख्या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं आहे. इतक्या वर्षात त्याला अनेकदा प्रश्न विचारण्यात आला की त्याचं लग्न कधी होणार. पण त्यावर सलमाननं कधी स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.