'तुला तुझ्या पालकांना S*x करताना...', India's Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात

Ranveer Allahbadia Controversy: सोशल नेटवर्किंगवर रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन आक्षेप नोंदवला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2025, 03:26 PM IST
'तुला तुझ्या पालकांना S*x करताना...', India's Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात title=
कार्यक्रमातील व्हिडीओ झाला व्हायरल

Ranveer Allahbadia Controversy: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादीया वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'बिअर बायसेप्स' चॅनेलमुळे प्रचंड लोकप्रिय झालेल्या रणवीर आता कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील एका प्रश्नामुळे वादात अडकला आहे.

नेमका काय प्रश्न विचारला रणवीरने?

स्टॅण्डअप कॉमेडी करणाऱ्या नवतरुणांना संधी देणाऱ्या समय रैनाच्या युट्यूब चॅनेलवरुन वेबकास्ट होणाऱ्या कार्यक्रमात रणवीर पाहुणा परिक्षक म्हणून सहभागी झाला होता. युट्यूबवर एक कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेल्या रणवीरने या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला. "तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की त्यामध्ये सहभागी होऊन हा प्रकार कायमचा संपवायला आवडेल?" असा प्रश्न रणवीरने विचारला. या शोमध्ये सोशल मीडियावरील स्टार असलेले आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग, अपूर्व मुखेजाही सहभागी झाले होते.

तो व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संताप

रणवीरने विचारलेल्या या प्रश्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन रणवीरवर टीका केली जात आहे. प्रसिद्ध गीतकार आणि पत्रकार निलेश शर्माने यावर आक्षेप घेतला आहे. "हा कंटेट अडल्ट कंटेटं म्हणून तयार करण्यात आलेला नाही. हा कंटेट लहान मुलही पाहू शकतात जर अल्गोरिऱ्दमने त्यांना हे व्हिडीओ दाखवले. कंटेट क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मला यासंदर्भातील संवेदनशीलता अगदी शून्य आहे. एखाद्या डेस्कवर बसून चार लोक आणि भरपूर सारे प्रेक्षक असा शो एन्जॉय करत असतील आणि त्यावर फार हसत असतील तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही," असं निलेश यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रवक्त्याचीही टीका

प्रेक्षकांनी या अशा गोष्टी सामान्य असल्याप्रमाणे या कंटेटला वागणूक दिली आहे. लोकांना असा कंटेट आवडतो हे आश्चर्य असल्याचंही निलेश यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही निलेश यांच्या पोस्टला रिप्लाय करताना हा सारा प्रकार म्हणजे काही क्रिएटीव्हीटी नाही, असं म्हटलं आहे. "वेड्यासारखी केलेली विधानं आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा चिंतेत टाकणार आहे," असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे. 

अनेकांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना, "या लोकांविरुद्ध कारवाई करा," अशी मागणी केली आहे.