चार वर्षांच्या चिमुरडीला ट्युशन टिचरची अमानुष मारहाण

चार वर्षांच्या मुलीला ट्युशन टिचरने मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिममधल्या रोहिदास वाडा इथे उघड झाली.

Updated: Sep 17, 2017, 10:23 PM IST
चार वर्षांच्या चिमुरडीला ट्युशन टिचरची अमानुष मारहाण  title=

कल्याण : चार वर्षांच्या मुलीला ट्युशन टिचरने मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिममधल्या रोहिदास वाडा इथे उघड झाली. कल्याण पश्चिमेकडच्या रोहिदास वाडा इथे राहणारी ४ वर्षांची मुलगी याच परिसरात राहणा-या आलिशा सारंगधर यांच्याकडे ट्युशनसाठी जाते.

शनिवारी ही मुलगी ट्यूशुनवरुन घरी रडतच आली. याबाबत तिच्या आईनं विचारलं असता, ट्युशन टिचरनं आपल्याला पट्टीनं मारल्याचं तिनं सांगितलं. या मुलीच्या अंगावर, मारहाणीचे वळ दिसल्याचं तिच्या आईवडिलांनी सांगितलंय. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्युशन टिचर आलिशा सारंगधर विरोधात बाल हक्क कायद्यांतर्गत तक्रार नोंदवली.