दोन बैल एकमेकांना भिडलेत, एक कुत्रा सोडवायला गेला आणि...पाहा हा व्हिडिओ

Two Bulls Fight : आता बातमी आहे दोघांच्या भांडणात मार खाणाऱ्या कुत्र्याची...नको ते धाडस करणं एका कुत्र्याला चांगलंच महागात पडलंय. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोयं...नक्की काय आहे हा प्रकार पाहुया.

Updated: Mar 21, 2022, 07:20 PM IST
दोन बैल एकमेकांना भिडलेत, एक कुत्रा सोडवायला गेला आणि...पाहा हा व्हिडिओ title=

मुंबई : Two Bulls Fight : आता बातमी आहे दोघांच्या भांडणात मार खाणाऱ्या कुत्र्याची...नको ते धाडस करणं एका कुत्र्याला चांगलंच महागात पडलंय. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोयं...नक्की काय आहे हा प्रकार पाहुया.

सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला झाला आहे त्यामध्ये दोन बैल आपापसात भांडताना दिसत आहेत. एका कच्च्या रस्त्याच्या कडेला अचानक दोन बैल एकमेकांना भिडतात आणि जोरदार दोघांची जुंपते. त्याचवेळी एक कुत्रा हे भांडण सोडवायला येतो. त्यानंतर बैल कुत्र्यालाच शिंगावर घेतो आणि उचलून फेकतो. 

शेताच्या बांधावर दोन बैलांची जोरदार झुंज सुरू होती...दोघंही टर्रेबाज. त्यामुळे कुणीही माघार घेईना. बघे हा सगळा प्रकार लांबून पाहत होते...पण, कुणाचाही पुढे जाण्याची हिंमत होईना....अखेर या दोन बैलांची झुंज रोखण्यासाठी कुत्र्यानं जोरदार एण्ट्री केली.

आणि इथेच कुत्रा फसला...चिडलेल्या बैलानं कुत्र्याचा कान तोंडाने पकडला आणि कुठच्या कुठे त्याला फेकून दिला...आता पुन्हा एकदा पाहा. दोन बैलांच्या झुंजीत कुत्र्याने एण्ट्री केली खरी पण, यात कुत्र्याने फुकटचा मार खाल्ला...यावेळी मात्र, काळ्या रंगाच्या बैलानं संधी साधली आणि पांढ-याला शिंगाने धडक दिली...हा सगळा थरार घोड्यावर बसलेली व्यक्ती लांबून पाहत होती. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.