जन्म झाला आणि पावणे २ मिनिटात आधारकार्ड रजिष्टर

देशात ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचं आधार कार्ड बनवणे अनिवार्य आहे.

Updated: Apr 27, 2018, 03:01 PM IST
जन्म झाला आणि पावणे २ मिनिटात आधारकार्ड रजिष्टर title=

बुलढाणा : देशात ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचं आधार कार्ड बनवणे अनिवार्य आहे. शाळेत दाखल्यावर नाव टाकायचं असेल, तर ते देखील आधारकार्ड शिवाय शक्य होत नाही. महाराष्ट्रातील आईवडिलांनी तर रेकॉर्डच केला आहे, जन्म झाला आणि १ मिनिटं ४८ सेकंदांनी त्यांनी आपल्या अपत्याचं नाव आधारकार्डसाठी रजिस्टर केलं. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिलला बुलढाण्यातील खामगावात एका महिलेने मुलीला जन्म दिला. या मुलीचा जन्म झाल्यानंतर १ मिनिटे आणि ४८ सेकंदांनी तिचं नाव आधारकार्डसाठी तिच्या वडिलांनी रजिस्टर केलं. देशातील पहिल्यादाच एवढ्या कमी वेळात एखाद्या लहान मुलाचं नाव आधार कार्डसाठी रजिस्टर झालं आहे.

आयसीयूमध्ये बनवण्यात आलं आधार कार्ड

 

या आधी रायपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दीड वर्षाच्या हिमांशू नावाच्या मुलाचं आधार कार्ड बनवण्यात आलं होतं. हिमांशूला ब्लड कॅन्सर होता. हिमांशूचे वडील शेतकरी होते, त्यांना मुलाच्या उपचारासाठी २ ते ३ लाख रूपये हवे होते. पैसे नसल्याने त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितलं, त्यांनी संजीवन निधीतून पैसे मिळतील, पण मुलाचं आधार कार्ड हवं असं सांगितलं, तेव्हा त्या मुलाचं हॉस्पिटलमध्येच आधारकार्ड बनवण्यात आलं.

या ठिकाणी अनिवार्य आहे आधार कार्ड

मोबालईचं नवीन सिम कार्ड, नवीन पॅन कार्ड बनवणे, पासपोर्टसाठी अर्ज, पीएफ खातं, बँक खातं, केवायसीसाठी आधार कार्ड.