पुणे महापालिकेकडून दुजाभाव? सामान्यांकडून बँडबाजा वाजवून कर वसूली, पण श्रीमंतांना ढील?

वसुलीत पुणे महापालिका पक्षपातीपणा करतेय असा आरोप केला जात आहे. सामान्यांच्या घरासमोर बॅडबाजा वाजवला जात आहे, मात्र श्रीमंताना शांततेत ढील दिली जातीये असा आरोप आहे  

शिवराज यादव | Updated: Feb 10, 2025, 09:06 PM IST
पुणे महापालिकेकडून दुजाभाव? सामान्यांकडून बँडबाजा वाजवून कर वसूली, पण श्रीमंतांना ढील? title=

मिळकत कर वसुलीसाठी पुणे महापालिकेकडून सध्या अनेक शकला लढवल्या जात आहेत, मात्र वसुलीत पुणे महापालिका पक्षपातीपणा करतेय असा आरोप केला जात आहे. सामान्यांच्या घरासमोर बॅडबाजा वाजवला जात आहे, मात्र श्रीमंताना शांततेत ढील दिली जातीये असा आरोप आहे. त्यामुळे वसुलीत दुजाभाव केल्याचा आरोप पुणे महापालिकेवर करण्यात आला आहे.

कर वसुलीत पुणे महापालिकेकडून दुजाभाव?
सामान्यांकडून बँडबाजा वाजवून कर वसूली
कोट्यवधींची थकीत असणा-यांवर पालिका मेहेरबान?

मिळकत कर वसूलीसाठी पुणे महापालिकेनं आता कंबर कसली आहे. पालिकेचं उत्पन्न वाढावं, याकरिता पालिकेकडून विविध मोहिम राबवल्या जात आहेत. 54 दिवसात 186 कोटींचा कर वसूल करण्यासाठी लोकांच्या घराबाहेर बँडबाजा वाजवण्यात आला. पालिकेच्या या बँडबाजा मोहिमेमुळे अनेकांनी कर भरला, मात्र सामन्यांना असा कडक न्याय लावला जात असतान बड्या थकबाकीदारांकडून मात्र वसुलीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही आहेत. सामान्यांना कर भरा नाहीतर मिळकत जप्त होईल, असा तगादा लावला जातआहे, मात्र श्रीमंत थकबादीदारांना सूट दिली जात आहे असा आरोप होत आहे. याबाबत मनसेनं आवाज उठवला आहे. 

- करसंकलन विभागाची जानेवारीपासून थकीत करवसुलीसाठी विशेष मोहीम 
- मोहिमेच्या 54 दिवसांत बँडबाजा वाजवत 186 कोटी 54 लाख 82 हजारांची वसूल 
-दीडशे मिळकतींना पालिकेनं टाळं ठोकलं
-आतापर्यंत एकूण 2 हजार कोटी 53 लाख रुपये मिळकतकर जमा 
-थकबाकीदारांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये बड्या उद्योजकांसह राजकीय नेत्यांचा समावेश
- त्यांच्याकडे तब्बल 334.10 कोटी रुपये थकीत
-करसंकलनात बड्या, श्रीमंत थकबादीदारांकडून जाणूनबुजून कानाडोळा केल्याचा आरोप

एकीकडे पुणे महापालिकेवर दुजाभावाचा आरोप होत आहे. मात्र आम्ही सगळं वसूल करतोय असं म्हणत महापालिकेने आरोप फेटाळले आहेत. 

मिळकत कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. पण हा कर गोळा करताना सर्वसामान्यांना एक न्याय आणि बड्यांना एक न्याय लावला जातो असा आरोप होत आहे. काही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असं सांगत वर्षानुवर्षे करवसुली झालीच नाही. त्यामुळे महापालिकाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. 

Tags: