पुणे : पुण्यात विठूनामाचा जयघोष सुरु आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यनगरीत आहेत. सर्वसामान्यांसह नेतेमंडळीसुद्धा पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं आहे.
माऊलींचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील मंदिरात आहे. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास पालखीचं मंदिरात आगमन झालं. त्या आधीपासूनच पुणेकरांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रविवारी पहाटे सहापासून पुन्हा दर्शन वारी सुरु करण्यात आली.