महाराष्ट्रातील या जगप्रसिद्ध शहरात आहे बड्या कंपनीचा प्रायव्हेट रेल्वेमार्ग, कुणालाच प्रवेश नाही; इथं जाणारे बोटीने किंवा रस्तेमार्गे जातात

RCF Railway : महाराष्ट्रात एक खाजगी रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर एका प्रायव्हेट कंपनीच्या ट्रेन धावतात. हे खाजगी रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध शहरात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 5, 2025, 06:38 PM IST
महाराष्ट्रातील या जगप्रसिद्ध शहरात आहे बड्या कंपनीचा प्रायव्हेट रेल्वेमार्ग, कुणालाच प्रवेश नाही; इथं जाणारे बोटीने किंवा रस्तेमार्गे जातात title=

Alibag Passenger Railway : महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय शहरांमध्ये भारतीय रेल्वेची कनेक्टिव्हीटी आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात भारतीय रेल्वेचा रेल्वेमार्ग आहे.  मात्र, महाराष्ट्रात एक असे शहर आहे जिथे एका बड्या पंकनीचा प्रायव्हेट रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गावर फक्त या कंपनीच्या ट्रेन धावतात. इतर कुणालाच येथे प्रवेश नाही.  विशेष म्हणजे हे शहर जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे शहर मुंबईपासून अगदी जवळ आहे. दररोज हजारो प्रवासी या शहरातून मुंबईत ये जा करतात. मात्र, रेल्वेची सोय नसल्यामुळे इथं जाणाऱ्यांना रस्तेमार्ग किंवा बोटीने जाण्याशिवाय पर्याय नाही. जाणून घेऊया ये शहर कोणते?

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही या विहीरीचे पाणी

महाराष्ट्रातील या जगप्रसिद्ध शहराचे नाव आहे अलिबाग. हे शहर एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला तसेच जगप्रसिद्ध मुरुड जंजिरा किल्ला हा अलिबागमध्येच आहे. अलिबाग हे रागयड तालुक्यातील सर्वात लोकप्रिय शहर आहे. सुंदर समुद्र किनाऱ्यांमुळे हे शहर पर्यटकांना आकर्षित करते. अलिबागमध्ये अनके लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत. यामुळे हजारो प्रवासी अलिबागमध्ये येतात. सुट्टीच्या दिवशी तर अलिबाग शहर पर्यटांनी फुलून जाते. 

हे देखील वाचा... एलिफंटाला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; फक्त गेट वे ऑफ इंडियाच नाही तर या मार्गाने देखील जाता येते 

अलिबागला जाण्यासाठी दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे रस्ते मार्गे आणि दुसरं म्हणजे जलमार्ग. मुंबई गोवा महामर्गावरील वडखळ येथून अलिबागला जाता येते. तर, मुंबईवरुन अनेक जण गेट वे  ऑफ इंडिय तसेच भाऊचा धक्का येथून बोट पकडून अलिबागला जातात. पेण रेल्वेस्थानकातून अलिबागला जाता येते. मात्र, हे रेल्वे स्थानक अलिबाग रेल्वे स्थानकापासून जवळपास 30 किमी अंतरावर आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्राची देवभूमी! दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही

अलिबाग शहराच्या अगदी जवळ म्हणजेच फक्त 5 किमी अंतरावर एक रेल्वे मार्ग आहे. मात्र, हा रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेचा नसून आर.सी.एफ. नावाच्या एका खाजगी कंपनीचा हा प्रायव्हेट रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर फक्त आर.सी.एफ. कंपनीच्या मालाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रेन धावतात. हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंदिस्त आहे. इथ कुणालाच प्रवेश दिला जात नाही. 

पेण रेल्वेस्टेशन पासून आरसीएफ थळ असा हा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे वाहतूक सुरु करावी अशी मागणी केली जात आहे. आरसीएफ थळच्या रेल्वे मार्गावर अलिबाग पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरसीएफ कंपनीच्या अध्यक्षांसह येथील स्थानिक लोकप्रतिनींधींनी अनेकदा चर्चा केली. मात्र, अद्याप हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही.  अलिबाग पॅसेंजर रेल्वे सुरु झाल्यास अलिबाग शहर हे कोकण रेल्वेच्या पेण स्थानकाशी जोडले जाईल. स्थानिकांना याचा मोठा दिलासा मिळेल. तसेच शहरातील पर्यटन वाढीला देखील चालना मिळेल.