पुणे : वारीत आज हळहळ व्यक्त करणारी घटना घडली. या घटनेने उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यातू अश्रु दाटून आलेत. तशीच वाईट घटना घडली. वारीच्या वाटेवरच माऊलींच्या अश्वाने अखेरचा श्वास घेतला. वारीतील प्रत्येकासाठी आहे दु:खत क्षण होता. सगळ्यांनाच खूप वाईट वाटले. एवढ्या मोठ्या गर्दीतही शांतपणे उभं राहणं असो की रिंगणातील थरारक दौड. यात अश्वाचा सहभाग असायचा. यापुढे माऊलींच्या या अश्वासचा यापुढे सहभाग असणार नाही.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या अश्वाचे नाव हिरा होते. गेल्या आठ वर्षांपासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला. आळंदीहून शनिवारी पालखीसह अश्वांनी प्रस्थान केले होते. ३० किलोमीटर अंतर चालून अश्व शनिवारी रात्री पुणे येथे मुक्कामी पोहोचले आणि आज सकाळी माऊलींच्या अश्वा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. या वृत्तामुळे वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या अश्वाचे साधारण वय बारा वर्षे होते. पालखी प्रस्थान दिवशी हा अश्व श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली (बेळगांव) गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता.