अनिरुद्ध दवाळे/उर्वशी खोना; झी मीडिया : काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. काँग्रेसनं इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडण्याची तयारी ठेवावी असा सल्ला अय्यर यांनी काँग्रसेला दिला आहे. एका माध्यमसमुहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे
काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व सोडण्यास तयार राहावे. इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही. कारण काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका हा पक्ष एकटा किंवा आघाडीत असला तरी नेहमीच महत्त्वाची राहील. राहुल गांधींना इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदापेक्षा काँग्रेस नेते म्हणून अधिक प्रतिष्ठा मिळेल. ममता बॅनर्जींसह इतर पक्षांतील अनेक नेत्यांमध्ये इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदाची पात्रता आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसची आगपाखड झालीय. अय्यर यांनी वायफाय बडबड करावी पण त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
मणिशंकर अय्यर यांचा वादग्रस्त विधानांचा इतिहास तसा जुना आहे. याआधीही मणिशंकर अय्यरांचा वादग्रस्त विधानांचा इतिहास आहे.
गांधी घराण्याने माझी राजकीय कारकीर्द घडवली आणि उद्ध्वस्त केली, पण मी कधीही भाजपात जाणार नाही
2018 - कराची भेटीत काश्मीरबाबत पाकिस्तानच्या धोरणाचा अभिमान असल्याचं विधान
2019 - अय्यर यांच्याकडून पंतप्रधान मोदींबाबत अपमानास्पद विधान.. नेहरु कुटुंबावर टीका करणाऱ्या मोदींचा नीच शब्दाचा उल्लेख. यानंतर पक्षाकडून अय्यर यांचं निलंबन
2023 - पाकिस्तानचे लोक आम्हाला शत्रू मानत नाहीत. गेल्या 9 वर्षांपासून पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झालेली नाही. याचा सरकार, लष्करावर परिणाम होत नसून तिथली जनता त्रस्त होतेय.
2023 - माजी पंतप्रधान नरसिंह राव जातीयवादी होते असं वादग्रस्त विधान.
बाबरी मशीद पाडली जात होती तेव्हा नरसिंह राव पूजा करत होते.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं विजय मिळवला नसला तरी भाजपला राक्षसी बहुमतापासून रोखलं. संसदेत विरोधकांचा आवाज संख्येनं वाढला. मात्र मागच्या काही दिवसात पुन्हा इंडिया आघाडीतल्या छोट्या कुरबुरी समोर येताहेत. आता मणिशंकर अय्यरांना जे वाटतं तेच इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनाही वाटत होतं. पुढच्या काळात इंडिया आघाडीतूनही काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठण्याची शक्यता आहे.