औरंगाबाद : झी २४ तासनं तूर खरेदीतील गोंधळ उघडकीस आणल्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून तूर खरेदीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
सोमवारपासून सरकारी तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात झाली होती. मात्र शेतक-यांकडून मर्यादीत तूर खरेदी केली जात होती.त्यामुळं उरलेल्या तूरीचं काय करायचा असा प्रश्न शेतक-यांना पडला होता. ही बाब झी २४ तासनं अधोरेखित केल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण तूर खरेदीचं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नव्हती.
सरकारनं काल रात्री हेक्टरी साडे पाच ऐवजी १३ क्विंटल तूर खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतक-यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजून शंभर टक्के दिलासा मिळालेला नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांनी हेक्टरी सरासरी १५ क्विंटल तर बागायती शेतकऱ्यांनी सरासरी २० क्विंटल तुरीचं उत्पन्न घेतलंय.
मात्र यानंतरही नवा शासन निर्णय काढून शेतकऱ्यांची उरलेली तूरही खरेदी करण्याचं आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी झी २४ तासवरून दिलंय.