नीरानरसिंहपूर ग्रामस्थांचा दारू विक्री बंद करण्याचा ठराव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातल्या नीरानरसिंहपूर ग्रामस्थांनी गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव केलाय. 

Updated: Jul 23, 2017, 09:16 PM IST
नीरानरसिंहपूर ग्रामस्थांचा दारू विक्री बंद करण्याचा ठराव

इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातल्या नीरानरसिंहपूर ग्रामस्थांनी गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव केलाय. 

गावात सुरु असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे महिला आणि यात्रेकरूना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागतोय. वारंवार मागणी करूनही पोलिसांना गावातील अवैध धंदे बंद करण्यात अपयश आल्यानं ग्रामसभेत ठराव करण्यात आला. 

महाराष्ट्रात महामार्गालगतच्या दारुच्या दुकानांवर बंदी घातलीये.. मात्र, ग्रामीण भागात गावठीसह देशी-विदेशी दारु विक्रीचे प्रमाण दिवसागणिक वाढत चाललंय. याकडे मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष द्यावं ही मागणी आता जोर धरु लागली आहे.