मुंबई : Maharashtra Political Crisis : भाजपकडून बंडखोर एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर सत्तेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेने बोलविलेल्या बैठकीला 17 आमदार वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या मित्रांमध्ये गणना केली जाते. शिंदे हे शिवसेनेचे जुने नेते आहेत, मात्र तेच शिंदे यांनी आता बंडाचे निषाण फडकवले आहे. त्यांनी 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून महाराष्ट्र सरकारला मोठा हादरा दिला आहे.
शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्षांचा पाठिंबा आहे. आज राज्यपालांना पत्र पाठवून मविआकडे संख्याबळ नसल्याचा दावा करणार आहेत. तर 10 खासदारांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा असल्याचीही माहिती आहे.
1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) उदय सामंत
7) सुनील राऊत
8) सुनील प्रभू
9) दिलीप लांडे
10) राहुल पाटील
11) रमेश कोरगावकर
12) प्रकाश फातर्पेकर
13) उदयसिंह राजपूत
14) संतोष बांगर (मतदार संघात )
15) आदित्य ठाकरे मातोश्रीवर आहेत
16) कैलास पाटील
17) संजय पोतनीस
18) भास्कर जाधव (मतदार संघात )
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे गटाचे 50 आमदार आणि भाजप यांची युती होऊन राज्यात नवे सत्तासमीकरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडूनही एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. तसेच 12 मंत्री होऊ शकतात, अशी शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक 50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळुन 164 आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करुन राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरु झाल्यात. आहेत.