पिंपरी-चिंचवड : भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या औषध फवारणी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या कानफटात मारल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास यमुनानगरमध्ये घडली.
गणेश जगताप असे मारहाण झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. केंदळे विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून सफाई कर्मचाऱ्यांनी यमुनानगर पोलीस चौकीत ठिय्या आंदोलन सुरु केले होते. अखेर केंदळे यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.