Invalid Aadhaar in Maharashtra: आपल्या देशात आधारकार्ड हा स्वत:ची ओळख दाखविण्यासाठी महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सरकारी असो वा खासगी..कोणत्याही कंपनीत आधार कार्ड हे मुख्य डॉक्युमेंट्स मानले जाते. पण या आधारकार्ड संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याचे समोर आले आहे.
राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र काही वेळातच अधिवेशनाचा पहिली दिवस आटोपता घेण्यात आला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज वादळी होण्याची शक्यता आहे.
आधारकार्डमुळे नागरिकांची ओळख पटते. त्यावर नागरिकांची सर्व महत्वाची माहिती असते. त्यामुळे या दस्तावेजाला विशेष महत्व असते. पण असे असताना राज्यातील 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 आधारकार्ड वैध ठरले आहेत. तर 3 लाख 8 हजार 811 विद्यार्थ्यांकडे अद्याप आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने लेखी उत्तरात विधान परिषदेत ही माहिती दिली.
आधार कार्ड अवैध ठरले असले तरी विद्यार्थांना योजनांपासुन वंचित ठेवण्यात येणार नाही. या विद्यार्थांना आधारकार्ड मिळवून देण्यासाठी यंत्रणा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
बार्टी संस्थेच्या माध्यमातून विधानसभेत मांडला होता. बार्टीद्वारे मागासवर्गीय मुलांसाठी प्रशिक्षण दिले जाते. मात्र मागासवर्गीय मुलां- मुलींवर प्रशिक्षण माध्यमातून अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे मागासवर्गीय मुलांच्या अडचणीत वाढ झाली आहे, असे नाना पटोले म्हणाले. 20 हजार मुलांचे प्रशिक्षण न्याय प्रविष्ट आहे. मंत्री तयार नव्हते त्यामुळे चुकेची उत्तर देत आहेत. सरकारमधील घटक पक्ष दुर्लक्ष करत नाहीत. देशात दलितांना, शोषितांना टार्गेट केले जात आहे. बार्टीतून मुलांवर अन्याय केला जात आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
"आज गोदी मिडिया असा उल्लेख मिडियाचा केला जातो. एका चॅनलने धाडस दाखवले त्याचे अभिनंदन करतो. सोम्मया हे भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र करणार होते . लोकांची घर तोडायला जात होते. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी पत्र लिहलं आहे. ही चौकशी ईडी सीबीआय किंवा अन्य कोणाला देणार का? किरीट सोम्मया भाजपचा मापदंड आहे का? धनंजय मुंडेच्या बाबतीत करुणा शर्मा पूजा प्रकरणी संजय राठोड, ब्रिजभूषण, राहुल शेवाळे, सोलापूर विजय देशमुख, अशा अनेक महिलांना न्याय मिळाला नाही. भाजपकडून महिलांना न्याय मिळेल का? भाजप सोम्मयांना क्लीन चीट देणार का?," असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे.