खडसे, मेहतांवरील अहवाल बाहेर येणार ?, अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार

२४ फेब्रुवारीपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रचंड वादळी ठरणार

Updated: Feb 20, 2020, 11:11 AM IST
खडसे, मेहतांवरील अहवाल बाहेर येणार ?, अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार title=

मुंबई : राज्य विधिमंडळाचं २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रचंड वादळी ठरणार आहे. कारण याच अधिवेशनात एकनाथ खडसेंच्या भोसरी एमआयडीसी प्रकरणी झोटिंग कमिटीचा अहवाल मांडला जाण्याची शक्यता आहे. 

त्याचबरोबर प्रकाश मेहतांविरोधातला लोकायुक्तांचाही अहवाल येणार आहे. फडणवीस सरकारनं दडवलेले चौकशी अहवाल फुटणार का, याची प्रचंड उत्सुकता आहे.

खरं तर महाविकासआघाडी सरकारविरोधात प्रस्ताव आणण्याची भाजप तयारी करत होतं. त्यासाठीची काऊंटर स्ट्रॅटेजी म्हणून महाविकासआघाडीनं हे दोन्ही अहवाल आणण्याची जोरदार तयारी केलीय.

त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात मोठं घमासान पाहायला मिळणार आहे.