महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान; मुंबई आणि ठाण्यात धावणार केबल टॅक्सी

Cable Taxis : मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी जबरदस्त प्लान बनवला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 26, 2024, 11:32 PM IST
महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान; मुंबई आणि ठाण्यात धावणार केबल टॅक्सी title=

Cable Taxis In Mumbai And Thane : महाराष्ट्रात महानमार्गांचे जाळे तयार केले जात आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरांची अद्याप वाहतूक कोंडीतुन सुटका झालेली नाही. मुंबई आणि ठाणेकर वाहतूक कोंडीच्या समस्यने सर्वाधिक त्रस्त आहेत. रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात  केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. 

हे देखील वाचा...  महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे.  बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात  केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग; चेन्नई एक्सप्रेसपेक्षा सुपरफास्ट प्रवास! 

सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही.  केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 

सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.

दरम्यान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली दरम्यान लाल परीने प्रवास केला आहे. यावेळी सरनाईक यांनी प्रवासी यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. राज्यातील सर्व आगारांची पाहणी करुन धोरणत्मक निर्णय घेणार असून राज्यातील परिवहन सेवेचे रुपड पालटणार असल्याचंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.