रत्नागिरी : कोरोना रुग्ण्यांच्या संख्येत वाढ होत असताना एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता चार वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ११ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला १२४ वर पोहोचला आहे.
BreakingNews । रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू । कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या चार । आणखी ११ नवे कोरोनाचे रुग्ण । जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२४ वर @ashish_jadhaohttps://t.co/zUoGCpjMvJ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 22, 2020
काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १६ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता मागील २४ तासात जिल्ह्यात आणखी ७ रुग्ण कोरोना बाधित आल्याचे प्राप्त झाले आहे. आता अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७७ इतकी झाली आहे. या सात जणांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन करुन ठेवण्यात आले होते. हे रुग्ण खेड, चिपळूण, दापोली येथील आहेत.यामुळे आता जिल्ह्यात एकूण करोना बाधीत रुग्णांची संख्या ११३ झाली आहे.
दरम्यान, रत्नागिरीत कोव्हीड १९चा सामना करण्यात ग्रामस्तरावर सरपंचांचा मोलाचा वाटा आहे. या सरपंचांसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वखर्चाने विमासंरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. कोरोनाचया पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणावर चाकरमानी जिल्हयात दाखल झाले आहेत, या सर्वाना होम क्वांरटाईन करण्यात आलेले आहे. या सर्वांची काळजी ग्रामस्तरावर ग्राम कृती दलावर आहे.