अमर काणे / नागपूर : राज्यात कोरोनाचा हाहाकार (Corona crisis) दिसून येत आहे. नागपुरातही कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यातच आता नवी चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीसच्या 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र, हे लसीकरण ज्येष्ठांसाठी (Senior citizen) अधिक त्रासदायक ठरत आहे. काहींना लसीकरण केंद्राजवळ जाता येत नाही. तर काही ज्येष्ठांना कोणाचाही आधार नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता येथील ज्येष्ठांची चिंता दूर होण्यास मदत झाली आहे. कोरोना काळात पोलिसांचा भरोसा सेल, दामिनी पथकाने आपुलकीचे नाते जपले आहे. त्यांच्या मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे घरात राहत आहेत. एकटेपणामुळं अनेकदा त्यांच्या मनात वैफल्य वा आपल्याला मदत करणारं कुणी नसल्याची भावना असते. कोरोनाच्या या काळात तर ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असल्याने त्यांच्याबाबतीत तर ही परिस्थिती आता अधिक बिकट झाली आहे. त्यामळे घरात पाहणारं कोणी नसल्याने अशा हजारो ज्येष्ठांसमोर लसीकरणाचेही आव्हान होते. ही गरज पाहता नागपूर पोलिसांनी एक पाऊल टाकत त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे.
व्हॅक्सिनेशनसाठी केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या एकट्या ज्येष्ठांसाठी पोलिसांचा भरोसा सेल आणि दामिनी पथक आपुलकीतून धावून आले आहे. वयाची साठी ओलांडलेल्या आणि एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना घरातून पोलीस रुग्णांयातील लसीकरण केंद्रापर्यंत आणून हा भरोसा सेल त्यांना व्हॅक्सिन्शन करवतंय. आणि सुरक्षित घरीही पोचवतंय. तक्यावरच हा भरोसा सेल थांबलं नाही. तर व्हॅक्सिनेशननंतर काही रिॲक्शनतर येत नाहिए ना याचाही हा सेल फॉलोअप घेते आहे. या सेलने आता शहरातील 5500 हून अधिक एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना आपुलकीच्या नात्यातून लसिसकरणाचा वसा 'हम है ना या मोहिमेअंतर्गत' उचलला' आहे.