काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मनात शंका, एकाचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोष कसा?

Maharashtra Political Crisis​ : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडे एकाचवेळी एवढे आमदार कसे काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

Updated: Jun 23, 2022, 10:39 AM IST
काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मनात शंका, एकाचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोष कसा? title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडे एकाचवेळी एवढे आमदार कसे काय,  अशी शंका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. एकाचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोष कसा, असा सवालही दोन्ही काँग्रेसने व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांचा सूर

राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीमाग इतके आमदार सेनेचे कसे यावरुन शंका व्यक्त केली जात आहे. दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांनी याबाबत शंका व्यत केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात आमदारांमध्ये असंतोष कसा ? शिवसेना आमदार तिकडे पाठवण्यात सेनेतील कोणी मुद्दाम खेळी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनाच धोका दिला का, अशी शंका व्यक्त केली आहे.
 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शासकीय वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री या आपल्या निवास्थानी दाखल झालेत. मुख्यमंत्री मातोश्रीवर आल्यावर पहिल्यांदाच शरद पवार यांच्याउपस्थित राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच आम्ही हे पाऊल उचलल्याचं सांगितले आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत अल्पमतात आलेल्या सरकार ला कसे वाचवायचे ? राजीनामा द्यायचा का ? की आणखी काही रणनीती आखायची यावर ही महत्वपूर्ण बैठक पार पाडत आहे.

शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्री यांनी काल आपल्या भाषणात स्पष्ट केले असले तरी आता सरकार अल्पमतात आल्याचे चित्र निर्माण झाल्याने या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.