डॉ. लागू यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 डॉ. लागू यांचं मंगळवारी निधन झालं. 

Updated: Dec 20, 2019, 08:43 AM IST
डॉ. लागू यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार title=

पुणे : नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अंत्यसंस्करापूर्वी डॉ लागू यांचं पार्थिव पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. डॉ.लागू यांचं मंगळवारी निधन झालं. 

डाँ. लागू यांचे पुत्र विदेशात होते. ते गुरुवारपर्यंत पोहोचू शकत नसल्याने त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं रूपवेध प्रतिष्ठान तर्फे कळवण्यात आलं होतं. डॉ लागू यांचं नाट्य तसेच सिने क्षेत्रात मोठं योगदान आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुभाष देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ लागू यांचे चाहते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

श्रीराम लागू दीर्घकाळापासून आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. ९ नोव्हेंबर १९७९ रोजी जन्मलेल्या डॉ. लागू यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. ते एक ईएनटी सर्जन (ENT Surgeon) होते. डॉ. लागू यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखलं जातं.

वेगळी ओळख 

१६ नोव्हेंबर १९२७ला त्यांचा जन्म झाला होता. 'सिंहासन', 'पिंजरा', 'मुक्ता' या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तसंच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. डॉ. लागू यांनी सुमारे १२५हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीसोबतच  बॉलिवूडमध्ये ही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतरही त्यांनी खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलं. अभिनेत्री दीपा लागू या त्यांच्या पत्नी आहेत.