दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'

   बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येणार अशी  चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वनिता कांबळे | Updated: Oct 12, 2024, 05:20 PM IST
दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...' title=

Pankaja Munde Son Aryaman Munde:   बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येणार अशी  चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमान देखील व्यासपीठावर उपस्थित होता.  पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला आवर्जून जवळ बोलावून घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपला मुलगा आर्यमान याची ओळख उपस्थितांना करुन दिली. मुलाची ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.  माझ्यावर संकट आले तेव्हा माझी जनता माझ्यासोबत उभी राहिली. मी निवडणूक हरले म्हणून पोरांनी जीव दिले यापेक्षा जास्त काय प्रेम असायला हवे, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे.

पंकजा मुंडे यांनी करुन दिली मुलाची ओळख

हा गोरा गोरा मुलगा कोण आहे. हा माझ्यापेक्षा फार उंच आहे. फार गोड आहे. माझा मुलगा आर्यमन आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मुलाची सर्वांना ओळख करुन दिली. आर्यमन भगवान बाबाच्या दर्शनाला आला आहे. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितलं तुझ्या पेक्षा माझी जनता मला प्रिय आहे, असं पंकजा मुंडे या म्हणाल्या.  माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. 12 कोटी या जनतेने भरले. माझा निकाल लागला. जीव दिला लेकरांनी. तुम्ही माझ्यावर जीव लावता की नाही, मुलीसारखं प्रेम करता की नाही. आता मला काही नाही पाहिजे, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.