Essel Group Chairman Subhash Chandra : एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.. सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांनी प्रचंड त्रास दिल्याचा गंभीर आरोप डॉ. सुभाष चंद्रा यांनी केलाय.. माधबी पुरी बुच यांच्याकडे भेटीची वेळ मागितली तेव्हा त्यांनी मला वाईट माणूस म्हटलं.. माधबी पुरी बुच यांनी माझ्या मुलाला सांगितले की तू तुझ्या वडिलांपासून वेगळा का होत नाहीस असा गंभीर आरोपही डॉ. सुभाष चंद्रा यांनी केलाय.
सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सेबीप्रमुखांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. माधबी पुरी बूच यांनी सरकारी वेतनासोबतच ICICI बँक आणि ICICI प्रूडेंशियल यांच्याकडून तब्बल 16 कोटींहून जास्त रक्कम घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. ICICI समूह आणि सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांचे सबंध जुने आहेत. माधबी पुरी या ICICI बँकेच्या व्यवस्थापन मंडळात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यासोबतच त्यांनी ICICI सिक्युरिटीजच्या सीईओ म्हणूनही काम केलंय. ICICI सिक्युरिटीज ही कंपनी शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. तर संपूर्ण आर्थिक क्षेत्राचं नियामक म्हणून काम करणारी सेबी ही सरकारी संस्था असल्यानं सेबी अध्यक्षांची मोठी जबाबदारी आहे. अशावेळी माधबी पुरी बुच यांच्यावर काँग्रेसने केलेल आरोप अत्यंत गंभीर आहेत.