माझं तिकिट कापण्यामागे 'फडणवीस-महाजन' - एकनाथ खडसे

भाजपाचे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Jan 2, 2020, 01:27 PM IST
माझं तिकिट कापण्यामागे 'फडणवीस-महाजन' - एकनाथ खडसे title=

जळगाव : भाजपाचे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझं तिकीट गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच कापलं गेलं. तसेच भाजपा महाराष्ट्रात आज सत्तेत असलेला पक्ष राहिला असता. पण आमच्या सारख्या नेत्यांच्या मागे कुरबुरींचा तगादा लावल्याने आम्ही बाहेर पडू शकलो नाहीत, असं एकनाथ खडसे यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे.

शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कबुली

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क केला आणि आपणही शिवसेनेच्या संपर्कात होतो असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. 

महाजन-फडणवीस यांच्यावर निशाणा

तसंच आपलं तिकीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच कापलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकनाथ खडसे यांनी उघडपणे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचं नाव घेत आरोप केले आहेत.