शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

१ मार्च २०१८ पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार, अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केलीय. 

Updated: Dec 22, 2017, 05:29 PM IST
शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी! title=

औरंगाबाद : १ मार्च २०१८ पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार, अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केलीय. 

पुर्णपणे असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, कुठलाही शेतीमाल शहरात येणार नाही आणि आता माघार नाही, अशी घोषणाच सुकाणू समितीच्या बैठकीत रघुनाथदादा पाटलांनी केलीय.

आत्तापर्यंत अनेकदा बोलूनही शेतकऱ्यांच्या मागणीवर सरकारनं कुठलेही ठोस उपाय केले नाहीत... १.५० लाखांची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

सोबतच बोंडबळीचा प्रश्न, कापसाचा भाव, उसाचा भाव या सर्वच बाबत सरकार गंभीर नाही, त्यामुळं पुन्हा आंदोलनाचे हत्यार शेतकरी उपसणार असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलंय. 

१६ किंवा १७ जानेवारीला सुकाणू समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर संप अटळ असल्याचंही ते म्हणाले.