भंडारा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असतील तर त्यांच्या पाठीशी आपण आहोत, अशी भूमिका माजी खासदार नाना पटोले यांनी मांडली. दरम्यान, पटोले हे दाभोळी गावातून पश्चाताप यात्रा सुरु करणार आहेत.
इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांच्या काळात शेतकऱ्यांना भरपूर लाभ मिळाले असं विधानही पटोले यांनी केलंय. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पटोले पहिल्यांदाच भंडाऱ्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
पटोले हे यवतमाळ तालुक्यातील दाभोळी गावातून पश्चाताप यात्रेला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच गावातून 'चाय पे चर्चा' या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. या पश्चाताप यात्रेचा समारोप मुंबईत होणार असल्याची माहितीही पटोले यांनी दिली.