तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : मोठ्या आनंदात लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडींना वाटेत अपघाताचा सामना करावा लागला. सातारा जिल्हयातील मांढरदेव येथून महाबळेश्वरला निघालेल्या वऱ्हाडच्या ट्रकला भीषण अपघात झाला (Accident In satara). या अपघातात 23 जण जखमी झाले आहेत. यामुळे वऱ्हाड लग्न मंडपाऐवजी हॉस्पीटलमध्ये पोहचले.
सातारा - पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर एका वऱ्हाडच्या ट्रकला अपघात झाला आहे. यामध्ये 23 जण जखमी झाले आहेत. यातील 4 जण गंभीर जखमी असून 19 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पाचगणीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकच्या ड्रायव्हरने मद्य प्राशन केले होते. यामुळे ड्रायव्हरचा ट्रक वरचा ताबा सुटून हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाई मांढरदेव येथून नवऱ्या मुलाचे एक वऱ्हाड ट्रक मधून जावली तालुक्यातील घोटेघर येथील लग्नासाठी निघाले होते. हा ट्रक पसरणी घाट चढून वर आल्यावर एका वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. या अपघातात 4 जण गंभीर तर 19 जण किरकोळ जखमी झाले आहेत. नवरा मुलगा आधीच दुसऱ्या गाडीने पुढे गेल्याने अनर्थ टळला आहे.
जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली. बारामतीमध्ये(Baramati) धक्कादायक घटना घडली. लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा राहिलेल्या सचिन उर्फ बबलू येळे याचे हदयविकाराने निधन झाले. लग्नाच्या साहव्या दिवशीच नवरीचं कुंकू पुसल गेल.