Mhada lottery 2024 Mumbai: हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांना दिसाला मिळाला आहे तो म्हाडामुळे. हक्काचे घर मिळवण्यासाठी अनेक जण म्हाडाच्या लॉटरीत आपलं नशिब आजमवत आहेत. मात्र, म्हाडाचा अर्ज भरताना फसवणूक होऊ शकते. म्हाडाच्या बनावट वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. स्वस्तात घर देण्याच्या नावाने लोकांना गंडा घातला जात आहे. म्हाडाची बनावट वेबसाईट बनवणाऱ्या 2 आरोपींना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल.. त्यासाठी अर्ज भरत असाल तर सावधान व्हा... कारण म्हाडाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते.. तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो... म्हाडाची हुबेहुब वेबसाईट बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आणि म्हाडाच्या याच बनावट संकेतस्थळावरून लोकांची फसवणूक करण्यात आलीय. म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून त्याद्वारे लोकांची फसवणूक करणा-यांना अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेनं या प्रकरणी 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात. 2024च्या म्हाडा सोडतीत त्यांनी बनावट वेबसाईट बनवली होती. त्यात स्वस्तात घरं मिळवून देण्याचा दावा करत त्यांनी लोकांची फसवणूक केली होती. या प्रकरणी BKC सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Mhada. Org अश्या म्हाडाच्या संकेतस्थळची हुबेहूब कॉपी तयार करून चार नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती आहे... म्हाडाचं घर पाहिजे तर 6 लाख भरा ,एकूण किंमत 29 लाख रुपये असं या वेबसाईटवर सांगण्यात आलं होतंय.. बनावट वेबसाईटचं होम पेज, पत्ता आणि पहिल्या पानावरील वेबसाईटची रचना म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटसारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तेव्हा फसवणूक झाल्याचं समोर येताच म्हाडाच्या आयटी विभागाकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
म्हाडाच्या घरांच्या किमती लवकरच कमी होणार आहेत... वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे.. यामुळे घरांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच घोरणात्मक निर्णय घेणार असल्याचं, आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलंय... म्हाडाच्या लोकशाही दिन कार्यक्रमावेळी अनेक रहिवाशांच्या तक्रारी आल्यामुळे, धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचं संजीव जयस्वालांनी म्हटलंय.. तसेच डीजी लॉकरच्या माध्यमाची बहूतांश नागरिकांना माहिती नसल्यामुळे, डीजी लॉकरच्या माध्यमातून कागदपत्रे सादर करण्याची अट शिथिल करून, जुन्या पद्धतीने कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत देखील सुरु करण्याची हालचाल करण्यात येत आहे..