मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जाते.
स्त्रिया ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ऋषीपंचमीचा सण साजरा केला जातो. ऋषीपंचमीच्या दिवशी व्रत करणार्या स्त्रीया बैलांच्या श्रमातून न पिकवलेल्या भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करतात. यादिवशी रानभाज्या,कंदमुळं आणि केवळ हाताने कष्ट करुन पिकवलेले अन्न सेवन करावे असे मानले जाते. या दिवशी आपल्या संस्कृतीतील ऋषींनी दाखविलेल्या मार्गावरून चालण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस मानला जातो. जरूर जाणून घ्या गणेशोत्सव विशेष - ऋषीपंचमीची भाजी कशी बनवाल?
कशी केली जाते ऋषीपंचमीची पूजा ?
सकाळी उठून आगाड्याची सात पानं आणि सात काड्या यांची प्रत्येकी पुरचुंडी बांधली जाते. आंघोळ करताना सात वेळेस ही पुरचुंडी डोक्यावरून मागे टाकावी असे सांगितले जाते. पूर्वी स्त्रिया ही आंघोळ एकत्र विहीरीवर किंवा नदीवर करत असे. आंघोळीनंतर नवे कोरे वस्त्र घालून पुढील पूजा केली जाते. ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तऋषींचा फोटो लावून पूजा केली जाते. यानंतर ऋषीपंचमीची कथा वाचली जाते. सप्तऋषींना नमस्कार करुन आपली काही चूक झाली असल्यास माफी मागतली जाते. प्रामुख्याने ही पूजा स्त्रिया करतात.