संपू्र्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या मारकडवाडीकडे लागून राहिले आहे. अशातच मारकडवाडीतून शरद पवार यांच्या EVMबाबतच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी आता उत्तर दिल आहे. EVM मध्ये घोळ करता येत नाही त्यामुळे शरद पवार यांचा विरोध असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तुमच्या EVM ला विरोध असेल तर आधी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा राजीनामा घ्यावा असं थेट आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी मारकवाडीतील सभेतून शरद पवार यांना केला आहे.
त्यावर आम्ही राजीनामा देयाला तयार आहे. तुम्हाला एका मतदार संघाची निवडणूक बॅलेट पेपरवर घेयची आहे. माझी झाली तर आम्ही देखील राजीनामा देऊ. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी अडचण नाही. लोकसभेला EVM मिशन व्यवस्थित होत्या पण विधानसभेत त्यामध्ये फेरफार करण्यात आली म्हणून आम्ही राजीनामा देतोय असं म्हणत गोपीचंड पडळकर यांच्या आरोपांना उत्तम जानकर यांनी उत्तर दिलं आहे.
गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आलाय. यांचे डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही असे भासवण्यात आलंय. या विधानसभेत 100 गाव असताना नेमकं माझ्याच मारकडवाडीला कां पुढे करण्यात आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
तर EVMमध्ये घोटाळा करता येत नाही. म्हणून विरोधक विरोध करत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.
मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
मारकडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येवढचं नाही तर त्यांनी गावात बैलगाडीतून एन्ट्री केली. तसेच विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी आसूडही ओढलेत. त्यामुळे पुढील काही दिवस मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अधीक तीव्र होत जाणार यात शंका नाही.