वर्धा : जिल्ह्यातील देवळी आणि आर्वि तालुक्यांना गारपीटीचा तडाखा बसाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता. अखेर सोमवारी झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी गारपीट झाली. गारपिटीसोबतच मुसळधार पावसानं यवतमाळला झोडपलं. यामुळे गहू, चणा आणि भाजीपाला पिकांना फटका बसलाय.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारी अमरावतीतील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय.
सोमवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नागपूर जिल्ह्याच्या नरखेड व काटोल तालुक्याला चांगलाच तडाखा दिला. संध्याकाळी झालेल्या गारपिटीने शेतात उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले. आवळ्याच्या आकाराच्या गारांनी गहू, हरभरा,संत्रा, मोसंबी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले.अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारी मदतीची मागणी केली आहे.