मुंबई / सांगली : राज्यात उष्णतेची लाट असणार आहे. पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. उन्हाचे चटके अजून वाढणार आहेत. दरम्यान, पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 19 ते 21 मार्च विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे. सांगली शहरातमध्ये आज कडक उन्हात पाऊस पडला.
सांगली आणि मिरज शहरात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला.
भारतीय हवामान विभागाने सूचित केल्यानुसार 19 ते 21 मार्च या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. यावेळी ढगांच्या गडगडाटाची शक्यता आहे.